सुरांच्या मैफिलीने पार पडला ठाणे ग्रामीण पोलिसांचा दिवाळी स्रेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:50 IST2018-11-16T21:13:42+5:302018-11-16T21:50:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ...

मराठी हिंदी सिने कलाकारांची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या संकल्पनेतूल दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हिंदी मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये डॉ. राठोड यांनीही महंमद रफींची गाणी गाऊन पोेलीस कुटूंबियांची दाद मिळविली.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘कोर्ट यार्ड’ हॉटेलच्या सभागृहात रंगलेल्या या बहारदार कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कर्तव्याचा भाग म्हणून पोलीस दलावर गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सलग व्यस्त बंदोबस्ताचे सण लागोपाठ येतात. त्यामुळेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कुटूंबांसमवेत असे सण साजरे करता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर