ठाण्यात महिलेच्या गळयातील मंगळसूत्र खेचून चोरटयांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 23:35 IST2020-10-27T23:29:48+5:302020-10-27T23:35:39+5:30
धर्मवीरनगर येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळयातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी खेचून पलायन केल्याची घटना सोमवारी घडली. गेली काही दिवस बंद असलेले सोनसाखळी जबरी चोरीचे प्रकार पुन्हा वाढू लागल्याने महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: धर्मवीरनगर येथून पायी जाणा-या गृहिणीच्या गळयातील सोन्याचे १९ ग्रॅम वजनाचे ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंतविहार लोकउपवन या गृहसंकुलामधील रहिवाशी असलेली ३१ वर्षीय महिला ही तिची दोन्ही मुले आाणि मेैत्रिणीसह २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास धर्मवीरनगर येथील टीएमसी गार्डन गेटच्या समोरील रस्त्याने मॉर्निग वॉक करुन घरी जात होती. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठरमागे बसलेल्याने या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचूून वसंतविहार सर्कलच्या दिशेने पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे अधिक तपास करीत आहेत.