ठाणे पोलिसांनी घेतला नईमचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 06:05 IST2018-07-14T06:05:40+5:302018-07-14T06:05:53+5:30

मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला.

 Thane police took control of Naim | ठाणे पोलिसांनी घेतला नईमचा ताबा

ठाणे पोलिसांनी घेतला नईमचा ताबा

ठाणे : मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला.
ठाणे पोलिसांनी ६ जुलै रोजी नईमच्या गोरेगावातील घरातून घातक शस्त्रसाठा हस्तगत केला. त्याची पत्नी यास्मिनला पोलिसांनी अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. २०१६ साली इक्बाल अत्तरवाला याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी नईम खानला अटक केली होती. तेव्हापासून तो ठाण्याच्या कारागृहात बंदिस्त आहे. शस्त्रसाठा नईमच्या घरात मिळाल्याने पोलिसांना त्याची सखोल चौकशी महत्त्वाची होती. मुंबईच्या मकोका न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी कारागृहाकडून नईमचा ताबा घेतला. शनिवारी त्याला ठाणे न्यायालयासमोर हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Web Title:  Thane police took control of Naim