शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाणे पोलिसांनी उतरवली दोन हजार ७१ तळीरामांची झिंग

By जितेंद्र कालेकर | Updated: January 1, 2019 22:39 IST

मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे.

ठळक मुद्दे राजकीय पदाधिकारी आणि बडया अधिकाऱ्यांवरही झाली कारवाई३१ डिसेंबरच्यामध्यरात्री ते नववर्षाच्या पहाटे ४ पर्यंत राबविली मोहीमचालक परवानेही होणार तात्पुरते निलंबित

ठाणे : थर्टी फस्टच्या पार्टीसाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि बड्या कंपन्यांच्या अधिकाºयांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती सूत्रांनी दिली.नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांच्या आनंदात कोणतीही बाधा येऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त मोक्याच्या ठिकाणी तैनात केला होता. मद्य प्राशन करून वाहन चालविणाºयांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते १ जानेवारी पहाटे ४ वाजेपर्यंत व्यापक मोहीम राबविली. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागातील १८ युनिट तसेच स्थानिक पोलिसांसह ३०० ते ४०० अधिकारी, कर्मचाºयांनी संपूर्ण रात्रभर कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होऊन अनेकजण जखमी तसेच अनेकांचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून ठाणे पोलिसांकडून ही कारवाई नववर्षाच्या प्रारंभी केली जाते. यंदा २२ श्वासविश्लेषक यंत्रणेच्या मदतीने ५० प्रमुख नाक्यांवर ही तपासणी झाली. याअंतर्गत काही जणांकडून प्रत्येकी दोन हजार रु पये याप्रमाणे ६२ हजारांचा दंड अनामत रक्कम म्हणून वसूल करण्यात आला. कारवाई केलेल्या इतरांचा चालक परवाना जप्त केला असून त्यांना न्यायालयात दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले............................पॉर्इंन्ट बदलल्यामुळे मासे गळालाठाणे शहरासह आयुक्तालयातील ५० ठिकाणी चेक पॉर्इंन्ट्स वारंवार बदलल्यामुळे अनेक मद्यपी चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मंत्रालय आणि ठाणे महापालिकेतील नोकरदार वर्ग तसेच बड्या कंपन्यांमधील अधिकारीही अडकल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. पकडल्या गेल्यानंतर संबंधित अधिकारी बड्या राजकीय नेत्याला किंवा इतर बड्या अधिका-यांना फोन लावत होते. पण असे कोणतेही फोन कारवाई करणा-या अधिका-यांनी न घेतल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली.............................अशी होणार कारवाईअनेकदा दंड आकारल्यानंतर मद्यपी व्यक्ती न्यायालयात येत नाहीत. त्यात त्यांचा परवानाही निलंबित होत नाही. त्यामुळेच यंदा बहुतांश चालकांकडून दंड आकारण्याऐवजी त्यांची वाहने जप्त केली. यात त्यांना न्यायालयात दोन हजार १०० रुपयांपर्यंत दंडही भरावा लागणार आहे. त्यांचा वाहन चालकपरवाना तीन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबित केला जाणार असल्याचेही एका अधिका-याने सांगितले.....................कुठे झाली कारवाईठाणे आयुक्तालयात सर्वाधिक कारवाई कळवा युनिटने २५० जणांवर केली. त्यापाठोपाठ मुंब्रा २००, कल्याण १५० तर डोंबिवली आणि कोळसेवाडी याठिकाणी २००, वागळे इस्टेट १७० आणि ठाणेनगर १५० अशा दोन हजार ७१ जणांवर कारवाई झाली. गेल्या वर्षी १२५० जणांवर अशी कारवाई झाली होती. यंदा ती दुप्पट झाली असून यामध्ये २० ते ३५ वयोगटातील तरुण चालकांचे प्रमाण अधिक असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह