मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांची झिंग उतरविणार- विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:12 PM2018-12-20T23:12:39+5:302018-12-20T23:21:44+5:30

थर्टी फस्ट अर्थात वर्षअखेर ३१ डिसेंबरची पार्टी साजरी करण्याच्या नावाखाली दारु पिऊन वाहने चालवितात. यात मोठे अपघातही होतात. अशा मद्यपींंवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुरुवारी दिला.

Police will give up the vengeance of those who drive by drinking liquor: Vivek Phansalkar | मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांची झिंग उतरविणार- विवेक फणसळकर

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त राहणार

Next
ठळक मुद्दे थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त राहणार ्रनियमांचे पालन केल्यास अपघातांवर नियंत्रण वाहतूक जनजागृती अभियानातील विविध स्पर्धकांना बक्षिस वितरण

ठाणे: अनेकदा तरुण मंडळी थर्टी फस्ट अर्थात वर्षअखेर ३१ डिसेंबरची पार्टी साजरी करण्याच्या नावाखाली दारु पिऊन वाहने चालवितात. यात मोठे अपघातही होतात. त्यामुळे अशा मद्यपींची झिंग उतरविण्यासाठी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात येणार असून अशा मद्यपींंवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुरुवारी दिला.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गेला आठवडाभर ‘टॅप’ अर्थात ट्रॉफिक अवेअरनेस प्रोग्रॅम शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला. यानिमित्ताने विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. याच स्पर्धांचे बक्षिस वितरण फणसळकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे झाले. त्यावेळी त्यांनी वाहतूकीचे नियम पाळण्याचा कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला. ३१ डिसेंबर या सरत्या २०१८ वर्षाला निरोपाची आणि १ जानेवारी या नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त शहरात जल्लोष साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नाक्यानाक्यांवर वाहन तपासणीही केली जाणार आहे. त्यामुळे नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री झिंगणाºया आणि वाहतूकीचे नियम तोडणाºयांवर कायद्याचा दंडूका बसणार आहे. ठाण्यातील तरूण मंडळी येऊर, उपवन, घोडबंदर मार्गावरील काही हॉटेलमध्ये पाटर्या करण्यासाठी जातात. अनेकदा मद्य प्राशन करुन वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठे असते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस कडेकोट बंदोबस्त तैनात करणार आहे. तसेच ब्रीथ अ‍ॅनलायझरचाही या बंदोबस्तामध्ये वापर होणार असल्याचेही फणसळकर यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात वाहने वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झालेली आहे. पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यात प्रयत्नशील आहेत. त्यासोबत नागरिकांनीही वाहतूक नियम पाळणे गरजेचे असल्याचा सल्लाही आयुक्तांनी यावेळी दिला. यावेळी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
.......................
वाहतूक नियमानासाठी आयोजिलेल्या घोषवाक्य स्पर्धेत प्रथम रिशिका मोरे (सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे), द्वीतीय वैभव वारिसे (कर्मवीर भाऊराव पाटील, महाविद्यालय) आणि तृतीय अंकिता मलावकर (आरजे ठाकूर महाविद्यालय) यांनी बाजी मारली.
तर पोस्टर स्पर्धेत विनोद मौर्य (आरजे ठाकूर ), द्वीतीय मृदूला कदम (ज्ञानसाधना) आणि राधिका शर्मा (कर्मवीर भाऊराव पाटील) यांनी बक्षिसे मिळविले. रांगोळी स्पर्धेत संतोषी कदम आणि इतर (के.बी.पी), रिद्धी चासकर आणि इतर (ज्ञानसाधना) आणि शारदा लोहार (आरजे ठाकूर ) यांनी बक्षिस पटकविले. सोलो स्पीच: प्रथमेश्वर उंबारे (जोशी बेडेकर कॉलेज) समीक्षा पोडवाल (केबीपी) आणि राजश्री तांबेकर (ज्ञानसाधना ) आणि पथनाटय स्पर्धेत वैभव डोमसे ग्रृप (के.बी.पी), विकास बदाडे ग्रृप (बांदोडकर कॉलेज) आणि सोमनाथ जाधव गृ्रप (आरजे ठाकूर ) यांना बक्षिसे पटकावली.

Web Title: Police will give up the vengeance of those who drive by drinking liquor: Vivek Phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.