ठाणे पोलिसांनी हस्तगत केले चोरी आणि गहाळ झालेले १०० मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:46 AM2022-01-20T00:46:16+5:302022-01-20T01:01:48+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली.

Thane police seize 100 stolen and missing mobiles |  ठाणे पोलिसांनी हस्तगत केले चोरी आणि गहाळ झालेले १०० मोबाईल

दोघांना अटक

Next
ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता शोध पथकाची कामगिरीदोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली. यामध्ये दोन चोरीचे तसेच दोन सोनसाखळी चोरीचेही गुन्हे उघड झाले असून याप्रकरणी अरुण कांबळे ( वय २६, रा. कल्याण) याच्यासह दोघांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहर परिसरातील वाढत्या मोबाईल चोरी तसेच जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यासाठी तसेच ते उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका मोबाईल जबरी चोरी विरोधी पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकातील
पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर आणि हुसेन तडवी यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मोठया कौशल्याने तपास करीत चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरु वात केली होती.
याचदरम्यान २० डिसेंबर २०२१ रोजी आधी अरुण कांबळे याला दिवा येथून तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून विशाल जाधव याला अटक केली. कांबळे याच्या चौकशीत रेल्वेतील एका मोबाईल चोरीचा शोध लागला. तर विशालकडून मोबाईल चोरीसह कोपरीतील दोन सोनसाखळी चोरीचे असे तीन गुन्हे उघड झाले आहेत. या पथकाने वेगवेगळया कंपनीचे १०० मोबाईल आणि चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोघांनाही संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. त्याचबरोबर आणखी काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. यातील दहा मोबाईल हे चोरीतील तर ९० मोबाईल गहाळ झालेले मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बहाणा करीत सामान्य नागरिकांना मोबाईलची विक्री-
मोबाईलची चोरी केल्यानंतर आपली आई आजारी आहे. तसेच गावी जायचे आहे, त्यासाठी पैसे नसल्याचा बहाणा करीत चोरटयांनी सामान्य नागरिकांना हे मोबाईल विक्री केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पलायन केले. अशा चोरटयांचाही शोध घेण्यात आहे.
* मोबाईल घेताना अशी घ्या काळजी-
मोबाईल चोरी झाला असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरी जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. अल्प किंमतीमध्ये कोणी मोबाईलची विक्री करीत असल्यास खातरजमा करुनच ते खरेदी करावे, अन्यथा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Thane police seize 100 stolen and missing mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.