शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी शोधले वृद्धेचे नातेवाईक: आई मुलाची झाली पुनर्भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 8:02 PM

एका रिक्षा चालकाने आणलेल्या अनोळखी ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाची भेट राबोडी पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून घडवून आणल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या या कर्तव्याबद्दल मुलानेही समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देशहापूर येथून झाली होती बेपत्ताअवघ्या २४ तासात झाली मुलाची भेटराबोडी पोलिसांनी घेतले परिश्रम

ठाणे: सोशल मिडियाच्या प्रभावी वापरातून एका ७० वर्षीय वृद्धेला तिचे नातेवाईक मिळवून देण्यात राबोडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या एका मेसेजमुळे रवींद्र भोईर (४५) या शहापूरच्या रहिवाशाला त्याची ७० वर्षीय वनिता भोईर ही आई अवघ्या २४ तासांमध्ये पुन्हा मिळाली. गुरुवारी राबोडी पोलिसांनी या हरविलेल्या या आईला सुखरुपपणे तिच्या मुलाच्या स्वाधीन केले.स्मृतीभ्रंश झाल्यामुळे शहापूर येथे रवींद्र ्र भोईर या मोठया मुलाकडे राहणारी वनिता ही वृद्ध महिला १२ जून रोजी भिवंडीतील कशेळी येथे आली होती. तिथे एका रिक्षा चालकाने तिला कापूरबावडी परिसरात सोडले होते. परंतू, तिला पत्ता आणि कसलीच माहिती देता येत नसल्यामुळे त्याने तिला राबोडी पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आणून सोडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तिचा फोटो व्हॉटसअ‍ॅपच्या ठाण्यातील अनेक गृपवर वितरित केला. ही माहिती या महिलेचा मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीवर असलेल्या रवींद्र या मुलाला मिळाली. त्याने गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास राबोडी पोलिसांशी संपर्क साधला. त्याने सर्व ओळख पटवून दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी तिला या मुलाच्या स्वाधीन केले.मुलाकडून पैशांसाठी त्रासमोठा मुलगा रवींद्र याच्याकडे ही महिला वास्तव्याला असली तरी तिचा धाकटा मुलगा तिला पैशांसाठी दमदाटीही करतो, असेही तपासात समोर आले. स्मृतीभ्रंश आणि मानसिक रुग्ण असल्यामुळे ही महिला यापूर्वीही गुजरातमध्ये निघून गेली होती, असेही रवींद्रने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं