Thane Police raises awareness about Corona through street play | ठाणे पोलिसांनी पथनाटयाद्वारे केली कोरोनाबाबत जनजागृती

ठाणे शहर पोलिसांच्या वतीने रेझींग डे सप्ताहाचे आयोजन

ठळक मुद्देठाणे शहर पोलिसांच्या वतीने रेझींग डे सप्ताहाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या वतीने रेझींग डे सप्ताहाच्या अनुषंगाने ठाणे शहरात कोरोनाबाबत मंगळवारी जनजागृती अभियान राबविण्यात आले. नाट्य-सिने दिग्दर्शक किरण नाकती यांच्या पुढाकाराने दोन ठिकाणी पथनाट्य सादर करु न कोरोना या साथीच्या आजाराबाबत घ्यावयाच्या खबरदारीची जनजागृती करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र पोलिसांच्या रेझींग डे सप्ताहाचे आयोजन २ ते ८ जानेवारी दरम्यान केले आहे. यानिमित्त ठाणे शहर आयुक्तालयात विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी अनुक्र मे जांभळी नाका आणि मासुंदा तलाव , चिंतामणी चौक येथे किरण नाकती दिग्दर्शीत पथनाट्याचे आयोजन केले होते.
हाताची स्वच्छता, मास्क लावणे आणि योग्य सामाजिक अंतर ठेवणे अशा कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेचे मार्गदर्शन लाभल्यामुळे नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

Web Title: Thane Police raises awareness about Corona through street play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.