शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

इफेड्रीनचा साठा नष्ट करण्यात ठाणे पोलिसांना अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:52 AM

येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा फटका ठाणे शहर पोलिसांना बसला आहे. शहर पोलिसांनी जप्त केलेला सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्जचा साठा येत्या २६ आणि २७ मे रोजी नष्ट केला जाणार होता.

ठाणे : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा फटका ठाणे शहर पोलिसांना बसला आहे. शहर पोलिसांनी जप्त केलेला सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्जचा साठा येत्या २६ आणि २७ मे रोजी नष्ट केला जाणार होता. मात्र, पालघर पोटनिवडणुकीमुळे आता जून महिन्यात हा साठा नष्ट केला जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने वर्तवली आहे. तसेच हा साठा नष्ट करण्यासाठी पावणेआठ लाखांचा खर्च होणार आहे.डायघरमध्ये १० एप्रिल २०१६ रोजी इफेड्रीन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अर्धा किलो ड्रग्जसह कल्याण गुन्हे शाखेने पकडले होते. तपास करताना, ठाणे पोलिसांनी सोलापूर हे या ड्रग्जचे प्रमुख केंद्र तसेच राष्टÑीय, आंतरराष्टÑीय ड्रग्जमाफिया यात गुंतल्याचे पोलिसांनी समोर आणले होते. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी, तिचा पती विकी गोस्वामी यांना फरार घोषित केले आहे.दरम्यान, ठाणे पोलिसांनी जप्त केलेला इफेड्रीन, सुडो इफेड्रीन, असेटिक अनहायड्रेड ड्रग्ज असा सुमारे २३ टन साठा असून सध्या सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत पोलीस बंदोबस्तात आहे. त्याची विल्हेवाट लावण्याबाबत मागील वर्षी जूनमध्ये ठाणे न्यायालयाने आदेश दिले. त्यानुसार, पुण्यातील रांजणगाव येथे २६ आणि २७ मे ही तारीख निश्चित केली होती. मात्र, सध्या पालघर पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्याने ठरलेल्या दिवशी साठा नष्ट होणे अशक्य असल्याचे पोलीस अधिकाºयाने सांगितले. परिणामी, पुन्हा नव्याने तारीख निश्चित करून तो साठा नष्ट करावा लागेल. कदाचित, जूनमध्ये हा साठा नष्ट केला जाऊ शकतो, असेही त्या अधिकाºयाने बोलताना सांगितले.