शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:07 IST

रवी पुजारी २५ गुन्ह्यांत वॉण्टेड; ठाणे पोलीस बंगळूरला रवाना

- जितेंद्र कालेकर ठाणे : बंगलोर पोलिसांनी नुकताच अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक २२ गुन्हे खंडणी, खंडणीसाठी धमकी, एक खून, तर एक खुनाचा प्रयत्न आणि पाच मोक्का असे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी बंगळूरला गेले असून त्याचा ताबा मिळविण्यासाठी तेथील न्यायालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच मुंबई, नवी मुंबई आदी परिसरांत १९९० ते २०१९ या २९ वर्षांच्या काळात बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते आदींना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाºया रवीविरुद्ध २५ पेक्षा अनेक गुन्हे दाखल आहेत.काही काळ छोटा राजन टोळीची सूत्रे सांभाळणाºया रवीने १५ वर्षांपूर्वी स्वत:ची टोळी तयारी केली. तिच्यामार्फत तो बड्या असामींकडून खंडणी वसूल करीत होता. अनेक ठिकाणी त्याच्या टोळीने खंडणीसाठी खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार केले. डोंबिवलीत २००२ मध्ये केबल व्यावसायात भागीदारी करण्यासाठी आनंद पालन या केबल व्यावसायिकाचा खून केला होता. तर, उल्हासनगरमध्येही खंडणीसाठी त्याने एका व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. वाढत्या संघटित गुन्हेगारी कारवायांमुळे रवीसह त्याच्या टोळीविरुद्ध कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी २०१० मध्ये आर्म अ‍ॅक्ट आणि खंडणीच्या गुन्ह्यात मकोकांतर्गत त्याच्यावर कारवाई केली. पुन्हा २०१५ मध्ये उल्हासनगरमधील खून प्रकरणातही मकोका दाखल आहे. तर, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मकोका दाखल आहे. २०१७ मध्ये कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाण्यात आणि २०१८ मध्ये अपहरण, खंडणीच्या गुन्ह्यातही मकोका दाखल आहे. त्याच्याविरुद्ध ठाणे शहरात चार, कल्याण परिमंडळातील पोलीस ठाण्यांमध्ये ११, उल्हासनगरमध्ये सहा तर वागळे इस्टेट परिमंडळात तीन असे २५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यातील बहुतांश म्हणजे १८ गुन्ह्यांचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाकडे आहे. सर्वच गुन्ह्यांमध्ये तो वॉण्टेड असल्यामुळे सर्व गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.लवकरच ठाणे पोलिसांकडे ताबापुजारीचा ताबा मिळण्यासाठी एक पथक २६ फेब्रुवारी २०२० रोजी बंगलोरला रवाना झाले आहे. ते त्याचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात मागणी करणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. तूर्त त्याचा ताबा मिळणार नसला, तरी येत्या काही दिवसांमध्ये तो ठाणे पोलिसांना दिला जाईल, असेही या अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारी