जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अल्पवयीन मुलीला शरीर विक्रयासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या कल्याणच्या पिसवली गावातील हॉटेल रिलॅक्स गार्डन अनेक्स लॉजिंग अॅन्ड बोर्डींग या लॉजमध्ये चालण-या लॉजमधील कथित कुुंटणखान्याला ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशाने मंगळवारी सीलबंद करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने सीलबंद करण्याची कारवाई केली.अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने १५ आॅगस्ट २०१७ रोजी कल्याणच्या मलंग रोडवरील याच लॉजमधून एका अल्पवयीन मुलीसह चार तरुणींची सुटका केली होती. त्यांना पैशाच्या अमिषाने शरीरविक्रयास लावणाºया सहा जणांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हा कुंटणखाना चालविण्यात येत होता. त्यामुळे अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ च्या कलम १८ अन्वये तो सीलबंद करण्याचा प्रस्ताव ठाण्याच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे पाठविला होता. याच प्रस्तावाची २७ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाल्यानंतर संबंधित लॉज सीलबंद करण्याचे आदेश आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले होते. याच आदेशानुसार दोन पंचासमक्ष दौंडकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक सतिश वाळके यांच्या पथकाने तो एक महिन्यासाठी सिलबंद केला आहे.आणखी कुंटणखाने सीलबंद करणारअनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम (१९५६) तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी तसेच अतिरिक्त दंडाधिकारी म्हणून पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १८ आणि २० च्या प्रयोजनासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. याच अधिकारांतर्गत पोलीस आयुक्तांनी कल्याणमध्ये ही कारवाई केली. अशाच प्रकारे कोणत्याही लॉज अस्थापना अगर इतर ठिकाणी अल्पवयीन किंवा सज्ञान मुलीचा वापर शरीर विक्रयासाठी केला जात असल्याचे आढळल्यास असे कुंटणखानेही सीलबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.
कुंटणखाना सुरु असलेला कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्तांनी केला ‘सीलबंद’
By जितेंद्र कालेकर | Updated: March 1, 2018 21:19 IST
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सिलबंद केला आहे. याच लॉजमधून सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसह चार मुलींची ठाणे पोलिसांनी सुटका केली होती.
कुंटणखाना सुरु असलेला कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्तांनी केला ‘सीलबंद’
ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण अन्वेषण विभागाची कारवाईअल्पवयीन मुलींचे झाले होते लैंगिक शोषणसार्वजनिक ठिकाणापासून अवघ्या २०० मीटरवर होता लॉज