शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

संचित रजा घेऊन पसार झालेल्या मध्यप्रदेशातील कैद्याला ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:27 PM

गेल्या १४ वर्षांपासून फरार असलेल्या मध्यप्रदेशातील खूनाच्या गुन्हयातील कैद्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली आहे.

ठळक मुद्दे मध्यवर्ती शोध पथकाची कारवाईखूनाच्या गुन्हयात झाली होती जन्मठेपेची शिक्षा११ दिवसांची पॅरोल रजा घेतली होती

ठाणे: मध्यप्रदेशातील जबलपूर मध्यवर्ती कारागृहातील खूनाच्या गुन्हयातील कैदी नैमुद्दीन काझी (५३) हा संचित (पॅरोल) रजेवर सुटल्यानंतर पुन्हा परत न जाता पसार झाला होता. त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने तब्बल १४ वर्षांनी भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली. त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मध्यप्रदेशातील एका खून प्रकरणात १५ फेब्रुवारी २००१ रोजी काझीला छिंदवाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवले होते. ही शिक्षा भोगत असतांना १४ डिसेंबर २००४ ते २८ डिसेंबर २००४ या ११ दिवसांच्या पॅरोल रजेवर त्याला कारागृहाने सोडले होते. ही रजा संपल्यानंतर पुन्हा कारागृहात परतणे अपेक्षित असतांना तो परस्पर पसार झाला होता. याप्रकरणी मध्यप्रदेशातील पांडुरना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झालेला आहे. गेल्या १४ वर्षांपासून पसार असलेल्या या कैद्याचा छिंदवाडा आणि मध्यप्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध घेण्यात येत होता. तरीही तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तो त्याच्या भिवंडीतील निजामपूर भागातील दूधनाका येथे एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सापळा रचून १ आॅगस्ट रोजी ७.२० वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी पांडुरना (छिंदवाडा, मध्यप्रदेश) पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस