शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ठाणे पोलिसांची कारवाई: तडीपारीचा आदेश मोडणारे दोन नामचीन गुंड पुन्हा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:47 IST

यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबईतून तडीपार झालेल्या अक्षय शिंदे तसेच सचिन कांबळे अशा दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

ठळक मुद्देअक्षय उर्फ अन्वर शिंदे याला कोपरीतून अटककान्या उर्फ सचिन कांबळे रामचंद्रनगरमधून जेरबंददोघांवरही ठाण्यासह चार जिल्हयातून हद्दपारीची कारवाई

ठाणे: खूनाचा प्रयत्न, हाणाम-या आणि जबरी चो-यांमध्ये ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांमधून हद्दपार केलेल्या अक्षय उर्फ अन्वर रोहिदास शिंदे (२३, रा.पारशेवाडी, कोपरी) आणि कान्या उर्फ सचिन सुभाष कांबळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. या दोघांविरुद्ध अनुक्रमे नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कान्या उर्फ सचिन कांबळे याच्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये एक खूनाचा प्रयत्न तसेच हाणामारीचे सात असे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याने वागळे इस्टेट परिसरासह ठाणे शहरात दहशत पसरवली होती. त्यामुळेच वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी त्याला ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबई जिल्हयातून १ एप्रिल २०१७ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. याच आदेशाचा भंग करुन तो ठाणे शहरात बिनधास्तपणे वावरत होता. तो वागळे इस्टेट भागातील रामचंद्रनगर येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाकरे यांच्यासह निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, हवालदार आनंदा भिलारे, संदेश चौधरी, ए. एस. कांबळे आणि टी. एन. पठाण आदींच्या पथकाने त्याला २८ जानेवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा अटक केली. त्याला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.कोपरीच्या पारशेवाडी भागातील रहिवाशी असलेला अक्षय उर्फ अन्वर शिंदे याच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात २० तर नौपाडा पोलीस ठाण्यात दोन असे २२ गुन्हे दाखल आहेत. चोरी, जबरी चोरी, हाणामारी, खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांचा यामध्ये समावेश आहे. कोपरीत अलिकडेच एकावर त्याने तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात त्याची १८ जानेवारी २०१८ रोजी जामीनावर सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांसह ठाण्यातील तीन हात नाका येथे एका रिक्षा चालकाकडून मोबाईल आणि काही पैसे लुबाडले होते. यात चेतन मायरेकर या त्याच्या साथीदाराला नौपाडा पोलिसांनी पकडले होते. अक्षय शिंदे मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची दखल घेऊन वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्तांनी त्याला यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्हयामधून हद्दपार केले होते. हद्दपार असतांनाच कोपरीत त्याने खूनाचा प्रयत्न केला. तर नौपाडयात जबरी चोरीचा प्रयत्न करुन तो पसार झाला होता. तो कोपरी पारशेवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा जेरबंद केले. त्याच्यावर १४२ नुसार कारवाई करुन अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा