ठाणे : ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटचे बनावट कागदपत्र तयार करणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:36 AM2018-01-23T03:36:28+5:302018-01-23T03:36:43+5:30

वाहन चालवण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला.

Thane: Four arrested for driving licenses, fake rickshaw permits | ठाणे : ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटचे बनावट कागदपत्र तयार करणा-या चौघांना अटक

ठाणे : ड्रायव्हिंग लायसन्स, रिक्षा परमिटचे बनावट कागदपत्र तयार करणा-या चौघांना अटक

Next

ठाणे : वाहन चालवण्याचा परवाना आणि आॅटोरिक्षाच्या परमिटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रांचा मोठा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आॅटोरिक्षासाठी बॅज, परमिट तसेच वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाºया टोळीची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. त्यानुसार, १८ जानेवारी रोजी भिवंडी येथील धामणकरनाका येथील केजीएन संजरी आॅटो कन्सल्टंटवर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी भिवंडी येथील गैबीनगरातील नफीज सगीर अहमद फारुकी (३८) आणि हापसन आळीतील नाजील नवाज अहमद मोमीन (२८) यांना अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, बनावट रहिवासी दाखला, रिक्षा परमिट आणि मोटार वाहन विम्याची कागदपत्रे तसेच लॅपटॉप, संगणक आदी साहित्यही जप्त करण्यात आले. भिवंडीतील रहिवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना परमिट मिळवून देण्याचा धंदा आरोपी ४-५ वर्षे करत आहेत.
चौकशीतून पोलिसांनी निजामपुरा येथील मोहमद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पू (३४) आणि शेलारगाव येथील संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी (४२) यांना अटक केली. मोहमदच्या दुकानात तसेच संगमेश्वरच्या घरी छापा टाकून शाळा सोडल्याचे बनावट दाखले, डॉक्टरचा बनावट शिक्का, आरटीओ अधिकाºयाचा शिक्का, बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीचा शिक्का आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैसा काम, वैसा दाम...-
आरोपींचे आरटीओ अधिकाºयांशी साटेलोटे आहे का, याचा तपास सुरू आहे. आरटीओच्या कोणत्याही कामासाठी सर्व प्रकारची बोगस कागदपत्रे आरोपी पुरवायचे. जेवढी बोगस कागदपत्रे लागतील, तेवढे जास्त पैसे ते लोकांकडून घ्यायचे. एका कामासाठी ६ हजार रुपयांपासून ३०हजार रुपयांपर्यंत ते लोकांकडून घ्यायचे, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. आरोपींना न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Thane: Four arrested for driving licenses, fake rickshaw permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.