शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

By अजित मांडके | Updated: January 29, 2024 13:28 IST

Thane: ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. 

- अजित मांडके (प्रतिनिधी)

ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. शहरात रस्त्यांची, गृहसंकुलांची, मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत असून, त्यामुळे वाहनांच्या हॉर्नमधून ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. शांतता क्षेत्रातही ध्वनीपातळी वाढली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिका कमी पडली का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठाणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेले शहर आहे. १८६३ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली तेव्हा शहराची लोकसंख्या नऊ हजार होती. जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाख ३७ हजार एवढी आहे. शहरात मागील काही वर्षांत विकासकामे झपाट्याने सुरू झाली. मोठमोठी गृहसंकुले उभी राहू लागली, त्यात घोडबंदर भागात मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दिवसरात्र सुरू आहेत. शहरातील वाहनांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. दरवर्षी रस्त्यांवर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या ८ ते १० टक्क्यांंनी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांचा आकार तोच आहे. शहरातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी आहे, ठाणे शहरातून मुंबई, गुजरात, नाशिक, भिवंडी या ठिकाणी जाता येत असल्याने रोज शहरातील रस्त्यांवर लाखो वाहने ये-जा करतात. 

घोडबंदर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूककोंडी सुरू होते, ती रात्री १० नंतरही तशीच असल्याचे चित्र माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी, पातलीपाडा आदी भागांत दिसून येते. सायंकाळी वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अक्षरश: डोके ठणकायला लागते. त्यावर महापालिका किंवा वाहतूक पोलिसांना अंकुश लावता आलेला नाही. वाहतूककोंडी, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामाची कामे सुरू असल्याने, सण-उत्सवानिमित्त मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. महापालिकेने शहरातील २० चौकांचे सर्वेक्षण केले, त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. 

गणेशोत्सव व दीपावलीच्या काळात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही मर्यादेपेक्षाही अधिक आढळून आली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे उपाय केले जात असल्याचा दावा केला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही होताना  दिसत नाही.  उलट ध्वनी प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच महापालिका हवा प्रदूषण रोखण्यात पास  झाली असली, तरी ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापास झाली, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :thaneठाणे