शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

Thane: प्रशांत जाधव हल्ल्याप्रकरणी एकाला अटक, प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्याची भाजपची मागणी

By जितेंद्र कालेकर | Updated: January 2, 2023 20:38 IST

Thane News:

- जितेंद्र कालेकरठाणे  - जपचे पदाधिकारी प्रशांत जाधव हल्ल्याप्रकरणी तीन दिवसांनंतर दहापैकी अमरिक राजभर (२९, रा. ठाणे) या आरोपीला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी पोलिस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी केली.

पोलिस आयुक्त सिंह यांना दिलेल्या निवेदनामध्ये डावखरे आणि आ. केळकर यांनी म्हटले आहे की, कशिश पार्क आणि परिसरातील अतिक्रमणे तसेच गैरप्रकारांविरोधात भाजपच्या जाधव यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. याच कारणावरून त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. कशिश पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी फलक लावण्यावरून त्यांना रोखण्यात आले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्याची पोलिसांकडून दखल घेण्यात आली नाही. याच दरम्यान जाधव यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी पूर्वनियोजित कट रचून हल्ला करण्यात आला. याच हल्ल्यात आरोपी म्हणून ठाणे महापालिकेच्या दोन माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यात जाधव यांच्यावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या फुटेजमध्ये एक पोलिस गणवेशात दिसत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरच हा हल्ला झाल्याचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

या प्रकरणाची वागळे इस्टेट पोलिसांकडून गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. मात्र, हल्ला घडल्यानंतर अनेक तास उलटूनही गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे संबंधित पोलिस अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली.

जाधव यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हाजाधव यांना मारहाण करणारे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी अमरिक राजभर याला अटक झाली आहे. उर्वरित आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे. तर जाधव यांच्यावरही हल्लेखारांपैकी एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी