Thane: पावणेतीन लाखांच्या एमडी पावडरसह एकाला अटक; घरात सापडल्या तीन तलवारी आणि चॉपर
By अजित मांडके | Updated: July 13, 2023 15:22 IST2023-07-13T15:21:54+5:302023-07-13T15:22:14+5:30
Thane: राबोडीत एका शाळेपासून ५० मीटर अंतरावर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दिपक उमाशंकर विश्वकर्मा (३२) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीचा एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

Thane: पावणेतीन लाखांच्या एमडी पावडरसह एकाला अटक; घरात सापडल्या तीन तलवारी आणि चॉपर
- अजित मांडके
ठाणे - राबोडीत एका शाळेपासून ५० मीटर अंतरावर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दिपक उमाशंकर विश्वकर्मा (३२) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तसेच त्याच्याकडून पावणे तीन लाख रुपये किंमतीचा एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. तसेच राहत्या घरातून तीन तलवारी व एक चॉपर अशी धारदार शस्त्रे मिळून आली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राबोडी, ठाणे येथील सरस्वती हायस्कुल या शाळेपासून केवळ ५० मीटर अंतरावर काही इसम हे परराज्यातुन एमडी पावडर हा अंमली पदार्थ आणुन विक्रीकरीत असल्याची माहीती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या पथकाने ०३ जुलै २०२३ रोजी राबोडी येथील कार वॉशिंग सेंटरचे पत्र्याचे शेड येथून दिपक विश्वकर्मा याला सापळा रचुन ताब्यात घेतले त्याच्याकडून एकुण ५५.९७ ग्रॅम एमडी पावडर या अंमली पदार्थासह तीन तलवारी व एक चॉपर अशी धारदार शस्त्रे हस्तगत केले.
त्याच्यासह त्याचा साथीदारांविरूद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ (क), २९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई अंमली ठाणे शहर पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार विक्रांत पालांडे, हरीप तावडे, राजकुमार तरडे, शिवाजी वासरवाड, हुसेन तडवी, महेश साबळे, संदीप भांगरे, हेमंत महाले,वैष्णावी परांजपे, पोलीस नाईक अनुप राक्षे, पोलीस शिपाई तेजल पाटीर यांनी केली आहे.
चालू वर्षात १३ गुन्हे दाखल ; ३५ जण अटक
ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने चालु वर्षात म्हणजे जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुध्द एकुण १३ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण ५४ लाख ८९ हजार ७५३ रुपये किंमतीचा अंमली पदार्थ तसेच एमडी हा अंमली पदार्थ बनविण्याकरीता लागणारे ९ लाख ५० हजार किंमतीचे साहीत्य जप्त केले आहे. तर याप्रकरणी ३५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.