शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

Thane: देशातील नामवंत चित्रकारांचे ‘नास्तिकता’ विषयावर राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन!

By सुरेश लोखंडे | Updated: October 20, 2023 16:50 IST

Thane: देशभरातील नामवंत चित्रकारांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन येथील तीन हात नाक्यावरील बाळासाहेब ठाकरे स्मारक कलादालनात २१ ते २३ ऑक्टाेंबर या तीन दिवसांसाठी ठाणेकरांनासह कला प्रमींसाठी खास भरवण्यात येत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे - देशभरातील नामवंत चित्रकारांनी ‘नास्तिकता’ या विषयावर काढलेल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन येथील तीन हात नाक्यावरील बाळासाहेब ठाकरे स्मारक कलादालनात २१ ते २३ ऑक्टाेंबर या तीन दिवसांसाठी ठाणेकरांनासह कला प्रमींसाठी खास भरवण्यात येत आहे. ब्राईट्स सोसायटीकडून भरवण्यात येत असलेल्या चित्रांची निवड कलाक्षेत्रातील कथितयश परीक्षकांनी केलेली आहेत.

येथील 'बाईट्स सोसायटी' या बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांच्या नोंदणीकृत संस्थेमार्फत वेळाेवेळी अनेक सामाजिक उपक्रम, मेळावे, परिषदा, प्रदर्शनं आयोजित केले जातात. यंदाही त्यांनी या देशभरातील नामवंत चित्रकारांच्या कुचल्यातून साकारलेल्या ‘नास्तिकता’ विषयावरील निवडक ५० कलाकृतींचे हे प्रदर्शना खास आयाेजित केले आहे. ब्राईट्सव्दारे सतत विवेकवादी विचार व शास्त्रीय दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार सातत्याने केला जाताे. या प्रदर्शनासाठी ही ब्राईट्सने सप्टेंबरमध्ये, "नास्तिकता" या विषयावर राष्ट्रीस पातळीवरील चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे. यासाठी रौनक ग्रुप चे राजन बांदेलकर व प्रतिथयश स्थापत्य अभियंता तथा चित्रकार जयंत कुलकर्णी यांनी ह्या स्पर्धेसाठी खास अमुल्य योगदान दिले आहे.

देशभरातील जवळ जवळ २५० ते २६० चित्रकारांचा या स्पर्धेत सहभाग हाेता. या चित्रकारांच्या चित्रांतून कलाक्षेत्रातील प्रथितयश परीक्षक, जेष्ठ कलाकार अमोल पालेकर व जेष्ठ चित्रकार केशव कासार यांच्या मार्फत साधारणपणे ५० कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. ह्या ५० निवडक चित्रांचे हे प्रदर्शन तीन दिवस ठाणेकरांसाठी सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विनामूल्या आहे. त्याचा माेठ्यासंख्येने लाभ घेण्याचा आवाहन ब्राईट्स साेसायटीकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :painitingsपेंटिंगthaneठाणे