जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या अफरीन खान (२०) या तरुणीला डायघर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने धक्कादायक माहिती दिली. आणखी दहा ते ११ मुलांना सहारा कॉलनी जवळील डोगरात पुरल्याचे तिने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या भागात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन या प्रकाराची पोलिसांनी खातरजमा केली. प्रत्यक्षात काहीही निष्पन्न न झाल्याने अफरीन दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले.
डायघरमध्ये ११ मुलांना पुरल्याच्या वृत्ताने ठाण्यात खळबळ: आरोपी तरुणीने केली पोलिसांची दिशाभूल!
By जितेंद्र कालेकर | Updated: April 2, 2019 22:10 IST
डायघर येथील सहारा कॉलनी डोंगराजवळ दहा ते ११ मुलांना पुरल्याचे अफरीन खान या आरोपी तरुणीने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. तीन चार तास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुनही तिने काहीच हाती न लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे.
डायघरमध्ये ११ मुलांना पुरल्याच्या वृत्ताने ठाण्यात खळबळ: आरोपी तरुणीने केली पोलिसांची दिशाभूल!
ठळक मुद्देसहारा कॉलनी डोंगर परिसरात पोलिसांनी केले खोदकामखोदकाम करुनही काहीच हाती लागले नाही वेगवेगळी माहिती दिल्याने पोलीसही संभ्रमित