ठाण्यात मुलाचा खून करून कर्जबाजारी संगीत शिक्षकाने केली आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Published: May 31, 2018 09:28 PM2018-05-31T21:28:30+5:302018-05-31T21:28:30+5:30

आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करुन स्वत:ही गळफास घेऊन शोमीक घोष या संगीत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी घडली. दुसरी पत्नी दिया हिच्या विरहातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

Thane musical teacher committed suicide by killing child in Thane | ठाण्यात मुलाचा खून करून कर्जबाजारी संगीत शिक्षकाने केली आत्महत्या

अनेकांचे लाखो रुपयांचे कर्ज

Next
ठळक मुद्देदुसऱ्या पत्नीचा विरह असहयदरवाजा तोडून काढावे लागले मृतदेहअनेकांचे लाखो रुपयांचे कर्ज






लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घोष यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कारचालक प्रवीण चव्हाण (रा. पातलीपाडा, ठाणे) यांना काही कामानिमित्त एका वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चव्हाण वकिलाला घेऊन कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव्ह’ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तेव्हा घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाºयांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरकाव केला. त्यावेळी शोमीक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, मुलगा एकांक्ष हाही बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी घरात झडती घेतली, तेव्हा पत्नी सोडून गेल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, अशा आशयाच्या त्याने चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यातील एक पत्नी, दुसरी पोलिसांच्या नावाने, तर उर्वरित दोन घरमालकाच्या नावाने आहेत. चारही चिठ्ठ्यांमध्ये जवळपास सारखाच मजकूर आहे. कर्जबाजारी असला तरी त्याबाबतचा फारसा उल्लेख नाही. पण, पत्नीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.



पहिल्या पत्नीकडून घटस्फोट...
शोमीक घोष याचा पहिल्या पत्नीशी न पटल्यामुळे २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून त्याला सात वर्षांचा एकांक्ष हा मुलगाही आहे.

शोमीकने २०१७ मध्ये दिया या तरुणीशी दुसरे लग्न केले. तिच्याकडून त्याने लग्नाआधीच ४० लाख आणि नंतर २० लाख असे ६० लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले होते. इमारतीमधील वाहने धुणाºया एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये, तर मुंबईतील सिंग या व्यक्तीकडूनही त्याने २५ लाख रुपये घेतले होते. अशा अनेक लोकांकडून त्याने एक ते दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. या प्रत्येकाला तो वेगवेगळी कारणे देऊन चकवा देत होता. त्याचे आईवडील कोलकाता येथे जिवंत असतानाही त्याने ते मृत पावल्याचे पत्नी दियाला सांगितले होते. परंतु, पत्नी या त्याच्या खोटारडेपणाला कंटाळली होती. घरीही कर्जवसुली करणाºयांच्या चकरा वाढल्या होत्या. या सर्वच प्रकाराला आणि त्याच्या खोटारडेपणाला कंटाळून दिया तीन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली होती.

Web Title: Thane musical teacher committed suicide by killing child in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.