शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाणे पालिकेच्या शाळेतील प्रकार, माध्यान्ह भोजनानंतर झाला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:34 IST

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते.

ठाणे : कळवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली असतानाच गुरुवारी दिव्यातील पालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ३९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही मुले सहावी इयत्तेत शिकत असून, त्यांच्यावर सध्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यातील ११ मुलांना पोटदुखीचा त्रास वाढला असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते. मात्र, खिचडीचा दर्जा तपासला जात नाही. त्यात पाल असल्याचा दावा येथील स्थानिक रोहिदास मुंडे यांनी केला आहे. तीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली आणि त्यातून त्यांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास झाला. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४४ विद्यार्थ्यांना याचा  त्रास जाणवला. त्यानंतर  तत्काळ याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ठाणे पालिकेकडून डॉक्टरांचे पथक  शाळेत दाखल झाले. यावेळी सहा डॉक्टरांचे पथक, दोन नर्स आणि तीन रुग्णवाहिका खबरदारीच्या दृष्टीने शाळेत दाखल झाल्या. त्यांनी या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. या ३९ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवत होता. 

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून, संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण किचनची व परिसराची पाहणी केली, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाSchoolशाळाStudentविद्यार्थी