शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
5
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
6
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
7
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
8
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
9
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
10
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
11
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
12
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
14
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
15
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
16
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
17
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
18
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
19
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
20
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी

क्लस्टर योजनेसाठी ठाणे पालिकेची रेंटल पॉलिसी; २0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:24 AM

पालिका स्वत: संक्रमण शिबिरांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात घरे उभारणार आहे. यामध्ये दोनपेक्षा जास्त पुनर्वसनाचे क्षेत्र असेल, त्याठिकाणी घरे उभारणार आहे.

ठाणे : क्लस्टर योजनेला चालना देण्यासाठी ठाणे महापालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. किसननगरसारख्या भागात ही योजना रुजवण्यासाठीच ही पावले उचलण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, क्लस्टर योजना राबविण्यासाठी रेंटलची पॉलिसी ठरविली जात आहे. या धोरणानुसार ज्या ठिकाणी पालिकेची रेंटलची घरे असतील, ती घरे या योजनेसाठी दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात पालिका स्वत: या योजनेसाठी संक्रमण शिबिरे उभी करणार आणि तिसºया टप्प्यात संक्रमण शिबिरे कमी पडल्यास पालिका संबंधित रहिवाशांना भाडे देणार आहे. यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून कागदावर असलेली क्लस्टर योजना आता प्रत्यक्षात राबविण्यासाठी पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, संक्रमण शिबिराचे नवीन धोरण पालिकेने पुढे आणले आहे. यामध्ये रेंटल हाउसिंग, स्वत: पालिका संक्रमण शिबिरे उभारणार आणि ज्या ठिकाणी संक्रमण शिबिरे उभारणे शक्य नसेल, त्याठिकाणी पालिका स्वत: रहिवाशांना भाडे देणार आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार असून, त्यासाठी २० कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.महापालिका देणार रहिवाशांना भाडेयामध्ये ज्या ठिकाणी पुनर्वसनाचे क्षेत्र हे दोन एफएसआयपेक्षा कमी असेल, त्याठिकाणी पालिका तेथील रहिवाशांना भाडे देणार आहे. येथील रहिवाशांनी इतर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात घरे भाड्याने घेऊन ते भाडे पालिकेकडून मिळविता येणार आहे. जोपर्यंत या योजनेतील इमारतींना वापर परवाना मिळत नाही, तोपर्यंत पालिका त्या रहिवाशांना भाडे देणार आहे. ही योजना राबविण्याचे निश्चित झाले असले, तरी पालिकेकडे सध्या रेंटलची अवघी ४६२ घरे उपलब्ध आहेत. येत्या काळात रेंटलमध्ये विस्थापित करण्यात आलेल्या विविध भागांतील लोकांना काही दिवसांत बीएसयूपीमध्ये घरे दिली जाणार असल्याने त्यातून दोन हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

पालिका स्वत: उभारणार घरेपालिका स्वत: संक्रमण शिबिरांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात घरे उभारणार आहे. यामध्ये दोनपेक्षा जास्त पुनर्वसनाचे क्षेत्र असेल, त्याठिकाणी घरे उभारणार आहे. ज्यांची घरे मोठी असतील, त्यांना येथे वास्तव्य करण्यास मिळणार आहे. यामध्येदेखील पालिका रहिवाशांना मोफत वास्तव्य करण्यास देणार आहे.भाडे महासभा ठरविणारमहापालिकेच्या माध्यमातून ही योजना पुढे आणली गेली असली, तरी त्यामध्ये संबंधित विकास करणाºया संस्थेकडून किंवा रहिवाशांना महापालिकेकडून किती भाडे द्यावे, याचा निर्णय महासभा घेणार आहे. त्यामुळे ते किती असेल, हे आताच सांगणे कठीण आहे.संक्रमण शिबिर योजनायामध्ये पालिकेकडे सध्याच्या घडीला ४६२ घरे हाजुरी येथे उपलब्ध आहेत. ही घरे १६० चौरस फुटांची आहेत. ज्यांची घरे लहान असतील, त्या रहिवाशांना ही घरे वास्तव्यासाठी दिली जाणार आहेत. यामध्ये रहिवाशांना मोफत वास्तव्य करण्यास मिळणार असून ज्या संस्थेच्या माध्यमातून अथवा विकासकाकडून योजना राबविली जाणार असेल, त्याच्याकडून पालिका भाडे घेणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका