ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST2021-07-24T04:23:57+5:302021-07-24T04:23:57+5:30

ठाणे : पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुरामुळे अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे ...

Thane Municipal Corporation's own water supply will be closed | ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे : पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुरामुळे अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

भातसा नदीतील पुराच्या पाण्यासोबत पानवेली व गवत वाहत येऊन पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरास चार ते पाच दिवसापासून कमी पाणीपुरवठा होत आहे. कचरा काढण्यासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. स्टेम वॉटर डिस्ट्री. ॲण्ड इन्फा. कं.प्रा.लि. यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, पवारनगर, आझादनगर या भागात सुरू राहणार आहे. दुपारी १ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राचा काही भागाचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: Thane Municipal Corporation's own water supply will be closed