शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठाणे महापालिकेची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 01:04 IST

लोकप्रतिनिधी आक्रमक : प्रधान सचिवांसमोरच प्रशासनाचे पितळ उघड

ठाणे : ठाणे महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षाचे पडसाद शुक्रवारी मंत्रालयातील ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड (टीएससीएल) या कंपनीच्या बैठकीतही उमटले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती आम्हाला दिली जात नाही, बैठकीचे गोषवारे आणि विषयपत्रिका अवघी एक दिवस आधी दिली जाते, त्यामुळे संचालक असतानाही आम्ही या योजनांबाबत अनभिज्ञ आहोत, असे आक्षेप घेऊन महापौरांसह लोकप्रतिनिधींच्या संचालक मंडळाने प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून ठामपा प्रशासनाला नगरविकासचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासमोर उघडे पाडले.

महापौरांच्या मागणीनुसार बैठकीतल्या विषय पत्रिकेवर कोणतीही चर्चा न करता ही सभा तहकूब करून ठामपा प्रशासनाची चांगलीच नामुष्की केली. ही बैठक सुरू होताच महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पालिकेची सर्वसाधारण सभा नसून आपले वाद येथे नको असे अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकप्रतिनिधींनी आपला सूर कायम ठेवला.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोणत्या योजनेचे किती काम झाले, त्यावर किती खर्च झाला, योजनेची सध्यस्थीती काय आहे याची कोणताही माहिती संचालक या नात्याने आम्हाला दिली जात नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. कुणाला आम्ही अशिक्षित वाटत असलो तरी तुमच्या सोबत आम्हाला बसविता हा तुमचा मोठेपणा आहे, असे मतप्रदर्शन मनुकूमार यांना उद्देशून म्हस्के यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोपरखळी मारण्याचा प्रयत्न केला. योजनांबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसून कामे कुठे सुरू करतात, उद्घाटने होतात हेसुद्धा कळत नाही असा आरोप पवार यांनी केला.नरेश म्हस्के यांचे नाव वगळलेस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड (टीएससीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे प्रशासकीय अधिकारी कंपनीत सरकारचे प्रतिनिधी आहेत. तर, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समतिी सभापती राम रेपाळे, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, भाजपचे गटनेते नारायण पवार आण िकॉग्रेसचे यासिन कुरेशी आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे पालिकेचे प्रतिनिधी आहेत. अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद आहे.

शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या गोषवाºयातून सभागृह नेत्यांचे नावच गायब होते.३१ मार्च रोजीच्या संचालक मंडळातही म्हस्के यांच्या नावाचा समावेश नव्हता. मधले नाव गायब कसे वगळले असे सांगून संतापलेल्या म्हस्के यांनी संबंधित अधिकाºयांना त्याचा जाब विचारला.मार्च महिन्यांत झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत राबविलेल्या कामांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश मनुकुमार यांनीच दिले होते. मात्र, आजतागायत ती माहिती मिळालेली नाही. त्यामुळे टीएससीएलचे संचालक असलो तरी आम्हाला त्या योजनांबाबत काहीच माहिती नाही. शुक्र वारी जी सभा होती त्याचे गोषवारे गुरुवारी देण्यात आले. एवढ्याकमी वेळात ते वाचून त्यावरील भूमिका मांडणे अशक्य होते. हे प्रकार सातत्याने होत असून प्रधान सचिवांनी सांगितल्यानंतरही कार्यपद्धती बदलत नसल्याने सभा तहकूबी मांडली होती. प्रशासनाकडून योजनांची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत सभेचे कामकाज करू देणार नाही. - मीनाक्षी शिंदे, महापौर

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका