शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:35 IST

मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

ठाणे - मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदा अशा पुरस्कारांची खिरापत कमी करण्याचा निर्णय महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घेतला आहे. परंतु असे असतांना देखील अनेक नगरसेवकांनी जे लायक नाहीत, अशांना पुरस्कार मिळावेत म्हणून शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे यंदा देखील पालिकेचा वर्धापन दिन या पुरस्कारांच्या निमित्ताने वादादीत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.     ठाणो महापालिकेचा 35 वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. परंतु यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरुन हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडू लागला आहे. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका नव्या दमाच्या नगरसेवकाने आपल्या पित्याला ठाणे भुषण पुरस्कार मिळावा म्हणून स्वत:च शिफारस केल्याचे पत्र महापौरांना दिले आहे. याशिवाय इतर गोंधळ आहे तो आहेच, मागील तीन दिवसांपासून अशा प्रकारे महापौर कार्यालयात शिफारशींचा पाऊस पडत आहे. परंतु याला नियमावली मात्र काहीच नाही, केवळ शिफारसी दिल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ज्या व्यक्तींची शिफारस केली जात आहे. त्या व्यक्तींची कोणतीही परिपूर्ण माहिती अथवा बायोडेटा मात्र जमा केला जात नाही. त्यामुळे एकूणच ठाणे गुणीजन पुरस्कार हे वादात सापडले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान व्हावे म्हणूनही काही नगरसेवकांनी शिफारसी केल्याचे दिसत आहे.     मागील वर्षी तर अनेक जणांना अशा प्रकारे ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिफारस देण्याची शेवटची तारीख उलटून गेली असतांनाही अगदी कार्यक्रम सुरू होण्यापर्यंतच्या वेळेआधी देखील शिफारसी दिल्या जात असल्याचा मुद्दा मागील वर्षी चांगलाच गाजला होता.    प्रत्यक्षात ठाणे भूषण, गौरव, विशेष आणि गुणीजन हे मानाचे पुरस्कार समजले जात आहेत. त्यामुळे असे पुरस्कार देतांना त्यांची संख्या किती असावी, याची मर्यादा असणो गरजेचे आहे. पुरस्कार देतांना त्या व्यक्तीचे कार्य पाहणो महत्वाचे आहे, यासाठी एका ज्युरी टीमची नेमणूक होणो देखील महत्वाचे आहे. परंतु तसे काहीही घडत नसून या पुरस्कारांचा अवमान करण्याचे काम राजकीय मंडळींकडून केले जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्याची गरज आता निर्माण झाली असून तशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  एकीकडे नको त्या मंडळींची शिफारस केली जात असतांना आणि जे या पुरस्कारांसाठी पात्र नसतांना अशांना हे पुरस्कार दिले जात आहेत. परंतु दुसरीकडे जे खरोखर या पुरस्कारासाठी पात्र अशांना मात्र डावलले जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणो भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले आहे. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्य देखील त्यांनी विषद केले आहे. श्रोती या शिक्षिका असून, वयाच्या 90 व्या वर्षी देखील बाह्यपरिक्षांची भूमिका बजावत असून, त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनी देखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु मिळालेल्या माहिती नुसार या शिक्षिकेला मात्र वादादीत ठरत असलेला आणि खिरापत म्हणून वाटप केला जात असलेला ठाणो गुणीजन पुरस्कार देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे