शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाची कोटींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:00 AM

मे महिनाअखेर १६६ कोटींची विक्रमी वसुली । २६ कोटींची वाढ

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ३१ मेपर्यंत मालमत्ताकर भरला, तर त्यावर १० टक्के सूट दिली जात आहे. या संधीचा लाभ घेऊन अनेक करदात्यांनी बिले अदा केली आहेत. यामुळे यासाठी आता १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी ३१ मे २०१९ पर्यंत मालमत्ताकर विभागाने १६६ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १४०.१३ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र त्यात २६ कोटींची वाढ झाली आहे.मालमत्ताकराचा भरणा करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मागील वर्षी या विभागाला ५५० कोटींचे टार्गेट दिले होते. यंदा त्यात वाढ करण्यात येऊन ते ६०० कोटी ठेवले आहे.

यामुळे पालिकेच्या मालमत्ताकर विभागाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डोळ्यांसमोर ठेवून यंदा आधीच बिलांची छपाई केली होती. त्यानुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी तसेच आचारसंहितेच्या काळात लोकांच्या घरात ही बिले पोहोचवण्यात आली होती. त्यामुळेच मालमत्ताकराच्या उत्पन्नात यंदा वाढ झाल्याचे पालिकेने सांगितले.

दुसरीकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेसुद्धा यंदा ३१ मे पर्यंत तीन कोटी २६ लाखांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंब्य्रातील वसुली उल्लेखनीयदरवर्षी वसुलीत मागे राहणाऱ्या मुंब्य्रातूनसुद्धा पहिल्या टप्प्यात मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास एक कोटीची जास्त वसुली झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. तर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने यंदा पहिल्याच टप्प्यात ४६.५३ कोटींची विक्रमी वसुली केली आहे. मागील वर्षी ती ३५.०४ कोटींच्या आसपास होती. यंदा त्यात ११.४९ कोटींची वाढ झाली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका