कोरोना रुग्णांसाठी ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स डॉ. पवारांकडून मोफत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 07:44 PM2020-07-24T19:44:10+5:302020-07-24T19:44:19+5:30

सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासत असते.

Thane Municipal Corporation has 10 ventilators for corona patients. Free from Pawar | कोरोना रुग्णांसाठी ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स डॉ. पवारांकडून मोफत 

कोरोना रुग्णांसाठी ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स डॉ. पवारांकडून मोफत 

Next

ठाणे : सध्या व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी तशी ओरडही एकायला मिळत आहे. ठाण्यातील या संभाव्य समस्येवर वेळीच मात करण्यासाठी कोरोना विशेषज्ज्ञ  सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप पवार यांनी 10 व्हेंटीलेटर्स ठाणे महापालिकेला मोफत दिले आहेत.  ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांच्या दालनात हा कार्यक्रम शुक्रवारी  संपन्न झाला.


       सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासत असते. यावर लक्ष केंद्रीत करून रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मध्यस्थीतून डाँ. पवार यांनी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागास दहा व्हेंटीलेटर्स मोफत दिले आहेत, असे इंदिसे यांच्याकडून सांगितले जात आहे.  यासाठी इंदिसे यांनी डॉ.  पवार यांच्याशी संपर्क साधून ठाणे पालिकेला व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्याची विनंती केली. डॉ. पवार यांनीही मोठ्या मनाने  ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स देण्याचे मान्य केल्याचे ही सांगितले जात आहे.


   व्हेंटीलेटर्स पालिकेकडे सुपूर्द केलेले डॉ. पवार हे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन आले असून आपल्या देशाप्रती असलेल्या आदरभाव आणि प्रेमापोटी मुंबईतील सेव्हन हिल्स, शताब्दी रुग्णालय येथे आपली सेवा देत आहेत. सामाजिक भान राखून त्यांनी कांदिवली येथील दोन्ही कोविड सेंटर्सच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. उत्तर मुंबईत ते नियमितपणे पोलीस दलाचे स्क्रीनिंग आणि पोलिसांवर उपचार करीत आहेत. सायन रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, रेड क्रॉस पुणे यांना डॉ. पवार यांच्या माध्यमातून पीपीई किट तसेच रुग्णवाहिकाही देण्यात आलेल्या आहेत. वाफेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्याचे संशोधन डॉ. पवार यांनीच केले आहे. त्यांच्या या कामामुळेच त्यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडीकल असोशिएशनने कोरोना वॉरियर पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Web Title: Thane Municipal Corporation has 10 ventilators for corona patients. Free from Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.