शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांवर शेलक्या शब्दांत टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 02:00 IST

चॅट व्हायरल : अधिकारी नेत्यांचे बटिक झाल्याचा केला आरोप

ठाणे : अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या ४८ तासांत मागे घेण्याची नामुश्की ओढवल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वरिष्ठ अधिकाºयांवर शेलक्या शब्दांत टीका केल्याने महापालिका वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. काही अधिकारी राजकीय नेत्यांचे बटीक असल्याचा आरोप जयस्वाल यांनी या संदेशात केल्याचे स्क्रिनशॉट बुधवारी व्हायरल झाले. पालिका अधिकाºयांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवलेल्या या संदेशांमध्ये आयुक्तांनी काही अधिकाºयांबाबत आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे दिसते. संबंधित अधिकाºयांनी त्यास दुजोरा दिल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला विश्वासात न घेता पालिकेतील चार उपायुक्तांसह पाच सहायक आयुक्तांच्या गेल्या शनिवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी हे आदेश काढले होते. या बदल्यांमध्ये वादग्रस्त उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवल्याने काही अधिकाºयांमध्ये नाराजी होती. त्यापैकी काहींनी ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानांवर घालताच त्यांनी तातडीने या बदल्या स्थगित करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यामुळे ४८ तासांत आयुक्तांना बदल्या रद्द कराव्या लागल्या. या प्रकाराने संतापलेल्या जयस्वाल यांनी अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नाराजी व्यक्त करत काही अधिकाºयांना फैलावर घेतले. या संदेशांत जयस्वाल यांनी अधिकाºयांचे नाव न घेता अपशब्द वापरले, असे या अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी शेलक्या भाषेचा वापर केल्याने आपण आवाक् झालो असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे अधिकाºयांचे कुटुंबीयही व्यथित झाले असून, त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, याबाबत जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.झुकते माप दिल्याची चर्चावरिष्ठ अधिकाºयांच्या बºयाच वर्षांनंतर बदल्या केल्या होत्या. त्यात ठरावीक अधिकाºयांना झुकते माप दिल्याची चर्चा होती. शिक्षण विभागाचा कारभार पाहताना उपायुक्त मनीष जोशी यांच्यावर अनेकदा टीका झाली. तरीही, त्यांच्याकडे महत्त्वाचे विभाग सोपविण्यात आले.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका