शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

तिजोरीत खडखडाट तरीही,आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधीचा खर्च  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 17:05 IST

Thane News : एकीकडे आरोग्यविषयक मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष सुरु असताना आयुक्तांच्या ऐषोआरामी सुखसोईसाठी ठाणेकर करदात्यांच्या पैशांचा चुराडा पालिका करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.

ठाणे - कोरोनामुळे ठाणे महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर कोट्यवधीचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.एकीकडे आरोग्यविषयक मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष सुरु असताना आयुक्तांच्या ऐषोआरामी सुखसोईसाठी ठाणेकर करदात्यांच्या पैशांचा चुराडा पालिका करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. जवळपास २ कोटीच्या आसपास खर्च केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दीर्घ रजेनंतर पदभार सोडल्याने ऐन कोरोना काळात नविन आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्विकारला.तेव्हा,पालिकेतील प्रशासकीय साखळीने पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल ५० लाखांची निविदा प्रक्रिया राबवुन आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीचा घाट घालण्यात आला.तेव्हाही या उधळपट्टीवरून वादंग उठला होता.मात्र,बंगल्याचे काम पूर्ण होण्याआधीच  अवघ्या अडीच-तीन महिन्यात सिंघल यांची बदली झाली. त्यानंतर जून २०२० अखेरीस ठामपा आयुक्तपदी डॉ.विपीन शर्मा विराजमान झाले.डॉ.शर्मा यांनी पदभार स्विकारला तेव्हा ठाण्यात कोरोनाचा कहर सुरू होता. कोरोना उपाययोजनासाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन व नगरसेवक निधीदेखील दिला होता. तरीही, प्रशासनाने घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या डागडुजीसाठी कोटयवधीचा खर्च केल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.

निविदेनुसार तब्बल ४९ लाख ८३ हजारांच्या या कामात बंगल्याचे वाॅटर प्रूफिंग,प्लबिंग करण्यात आले आहे.तर, बंगल्यात अन्य काही सुखसोईसाठी लाखोंचा खर्च केल्याचे समजते.तत्कालीन आयुक्त जयस्वाल यांच्या काळातही आयुक्त बंगल्यावर लाखोंची उधळपट्टी केली होती.तरीही पुन्हा कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा आयुक्तांनी या खर्चाला कात्री लावून कोरोनाविषयक कामे करण्यास प्राधान्य देणे गरजेचे होते. असे मत संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले आहे.

निविदा प्रक्रियेत गडबड सर्वसाधारणपणे निविदा भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो.अत्यावश्यक कामासाठी हा कालावधी सात दिवसांचा असतो.त्याच धर्तीवर बंगल्याच्या कामासाठी सात दिवसात निविदा मागवल्याचे समोर आले आहे.डागडुजी करण्यापुर्वी बंगल्याचे स्ट्रक्चर आॅडिट झाले आहे का,कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीला काटेकोर नियम मग बंगल्याच्या दुरूस्तीला मुभा का ? असे सवालही संदीप पाचंगे यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका