ठाणे, कोपर स्टेशन बुलेट ट्रेनशी जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:44 IST2025-10-07T09:44:04+5:302025-10-07T09:44:13+5:30

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल.

Thane, Kopar stations to be connected to bullet train Mhatardi station | ठाणे, कोपर स्टेशन बुलेट ट्रेनशी जोडणार

ठाणे, कोपर स्टेशन बुलेट ट्रेनशी जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई - मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेल ने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्रधीकारानास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या हायस्पीड रेल्वे प्रधीकार्णाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे.

अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.

Web Title : ठाणे, कोपर स्टेशन बुलेट ट्रेन से जुड़ेंगे

Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना के लिए ठाणे के म्हातर्डी स्टेशन को ठाणे, कोपर स्टेशन और तलोजा मेट्रो से जोड़ने की संभावना तलाशने के निर्देश दिए। इसका उद्देश्य रेल, मेट्रो, बस और राजमार्ग नेटवर्क को जोड़कर एक एकीकृत परिवहन केंद्र बनाना है।

Web Title : Thane, Kopar Stations to Connect with Bullet Train Project

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde directed officials to explore connecting Thane's Mhatardi station to Thane, Kopar stations, and Taloja Metro for the Mumbai-Ahmedabad bullet train. This aims to create an integrated transport hub linking rail, metro, bus, and highway networks, enhancing passenger convenience.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.