शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

खूशखबर ! ठाणे-कल्याण-वसई जलवाहतुकीच्या कामाला लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 10:54 IST

कल्याण आणि ठाणेवासीय ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे.

ठळक मुद्दे जेट्टींच्या बांधकामाला सुरुवातठाणे महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी करणार काम डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे होणार जेट्टी

ठाणे - कल्याण आणि ठाणेवासीय ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या डीपीआरला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटी या जेट्टींचे बांधकाम करणार आहे. ठाणे-कल्याण-वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येणार आहे.

ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे केंद्र सरकारकडे गेल्या साडेचार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांना पाठबळ लाभले. या पाठपुराव्यामुळेच केंद्र सरकारने कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला होता. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण प्रकल्पाचा डीपीआर तयार करून त्याचे सादरीकरण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले. कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प होणार असून पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई हा ६४५ कोटी रुपयांचा जलमार्ग विकसित करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.

आता या प्रकल्पांतर्गत १०० कोटींचा निधी जेएनपीटीकडे वर्ग करण्यात येत असून त्याअंतर्गत डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जेएनपीटी ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने हे काम करणार आहे. जसजसे काम पुढे सरकेल, तसतसा केंद्राकडून निधी प्राप्त होणार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे ठाणे आणि त्यापुढील प्रवाशांना रेल्वेव्यतिरिक्त वाहतुकीचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत तो दाखल व्हावा, यासाठी शिवसेना पाठपुरावा करत राहणार असल्याचेही  शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही त्यांनी आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका