ठाणे, कळवा, मुंब्य्रात पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 03:00 IST2018-09-28T02:59:36+5:302018-09-28T03:00:32+5:30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने देखभाल व दुरु स्तीची कामे हाती घेतल्यामुळे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा शुक्र वारी बंद राहणार आहे.

 Thane, Kalwa, Mumbra has no water supply today | ठाणे, कळवा, मुंब्य्रात पाणी नाही

ठाणे, कळवा, मुंब्य्रात पाणी नाही

ठाणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने देखभाल व दुरु स्तीची कामे हाती घेतल्यामुळे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा शुक्र वारी बंद राहणार आहे. या कालावधीत मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागांचा समावेश आहे, तर स्टेम वॉटर डिस्ट्री अ‍ॅण्ड इन्फ्रा कंपनीनेही पम्पिंग दुरुस्तीचे काम करणार असल्याने शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कळवा आणि मुंब्य्रातील पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे तो पूर्वपदावर येईपर्यंत पुढील स्टेम वॉटर डिस्ट्री अ‍ॅण्ड इन्फ्रा कंपनी यांच्या पम्पिंग दुरु स्तीसाठी ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा आदी भागांत पाणी येणार नाही.

Web Title:  Thane, Kalwa, Mumbra has no water supply today