शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 5:11 AM

भातसा धरणात तांत्रिक बिघाड : शुक्रवार, शनिवारी कमी दाबाने पुरवठा

ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारपासून बंद झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा घोडबंदर भागाला बसला असून त्या खालोखाल कोपरी, टेकडी बंगला, अंबिकानगर आदी पसिराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परंतु, आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूकरण्यात येणार आहे. असे असले तरी १४ जूनपर्यंत शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्याला गुरूवारी ६० टक्के पाणीकपातीचा फटका बसला आहे.

ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे २८ आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारे ४ ही पंप बंद पडले होते. अखेर १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून पाणी उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु, भातसापासून पिसेपर्यंत पाणी उचलण्यात येत असून हे १६ किमीचे अंतर आहे. त्यामुळे या १६ किमीच्या कॅनालमध्ये खडखडाट झाला होता. नंतर जेव्हा पाणीपुरवठा सुरू झाला, तेव्हा या कॅनालमधून पाणी पिसेपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होऊन त्याचा फटका ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या कॅनालमध्ये पाणी सुरुवातीला न आल्याने ते सुकले होते. त्यातच त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे येथून पुढे पाणी जाईपर्यंत अडथळे निर्माण झाले होते. या अडथळ्यांमुळे मुंबईने पाणी उचलण्यासाठी आपला प्रेशर ६५ वरून ३५ वर आणला होता. तर ठाणे महापालिकेला मात्र शून्य प्रेशर मिळाला. मुंबईचे २८ पैकी सुरुवातीला १५ पंप सुरू होते. तर ठाणे महापालिकेचा केवळ १ पंप सुरू होता. त्यामुळे ठाण्याला मात्र ६० टक्के फटका बसल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिका बीएमसीकडून ६० एमएलडी पाणी उचलत असल्याने त्याचाही फटका ठाण्यालाच अधिक बसल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाण्यातील अनेक भागांत पाण्याचा खडखडाट होता. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून बुधवारी सायंकाळपासून या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहरातील कोपरी,अंबिकानगर, टेकडी बंगला याशिवाय उंचावरील भागांनाही याचा अधिक फटका बसला आहे.टँकरची संख्या वाढली दुपटीनेच्ज्या ज्या भागांना पाणी नाही, त्या भागात पालिकेच्या माध्यमातून २५ टँकरेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, रोज होणाऱ्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.च्शुक्रवार आणि शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर भातसा ते पिसेर्पयतच्या कॅनालमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. नंतर पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा म्हणून ठाणे महापालिकेने या कॅनालमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.इंदिरानगरमध्ये हाल : इंदिरानगर भागात आधीच ९ आणि १० जून रोजी एमएसईबीच्या वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्याने पाणीकपातीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. त्यात आता पुन्हा येथील रहिवाशांना १४ जून पर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आजचा शटडाऊन रद्द : तांत्रिक दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने ठाणेकरांचे आधीच हाल झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारा शटडाऊन तूर्तास रद्द केला आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी