Thane district will get another 81,000 vaccines, vaccination will be accelerated | ठाणे जिल्ह्याला आणखी ८१ हजार लस मिळणार, लसीकरण गतीमान होणार

ठाणे जिल्ह्याला आणखी ८१ हजार लस मिळणार, लसीकरण गतीमान होणार

ठळक मुद्देदरम्यान पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सुत्रंनी दिली आहे. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे - मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध् झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा उत्सव केवळ दोन दिवसच चालेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवारी सकाळ र्पयत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.  
           
ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसापासून लसीकरण मोहीमेचा फज्ज उडाल्याचे चित्र दिसत होते. तर लसींचा साठा अपुरा असल्याने विकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकाराने जाहीर केल्यानुसार लसींचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेच जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनापुढे निर्माण झाला होता. परंतु आता जिल्ह्यासाठी सोमवारी सकाळी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार त्याचे वाटपही करण्यात आले आहे. या सर्व लसी कोव्हीशिल्डच्या असल्याचेही सांगण्यात आले आहे. परंतु उपलब्ध झालेला साठा वितरीत केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला १५०० ते २० हजार र्पयत साठा मिळाला आहे. त्यामुळे हा साठा किती दिवस पुरणार असा प्रश्न महापालिकांना पडला आहे.

दरम्यान पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सुत्रंनी दिली आहे. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवार सकाळ र्पयत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हा साठा वेळत आला तरच हा उत्सव साजरा होऊ शकणार आहे. तर या साठय़ाचे वाटप दिवसभर सुरु होते, त्यामुळे अनेक ठिकाणी रोजच्या रोज सुरु असलेल्या केंद्रापैकी अनेक केंद्र सोमवारी देखील बंदच असल्याचे दिसून आले आहे. परंतु मंगळवारी सर्व केंद्रावर लसीकरण पुन्हा सुरु होईल असा दावा महापालिकांच्या वतीने करण्यात आला आहे.

महापालिका मिळालेला लसींचा साठा

ठाणे - १५०००
नवी मुंबई - २००००
कल्याण डोंबिवली - १२०००
उल्हासनगर - १५००
भिवंडी - १५००
मिराभाईंदर - १५०००
ठाणे ग्रामीण - २००००

Web Title: Thane district will get another 81,000 vaccines, vaccination will be accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.