ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ७२ हजार ३०० लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST2021-04-20T04:41:49+5:302021-04-20T04:41:49+5:30

ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. त्यानंतर जिल्ह्याला आधी ८५ हजार ...

Thane district got another stock of 72,300 vaccines | ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ७२ हजार ३०० लसींचा साठा

ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ७२ हजार ३०० लसींचा साठा

ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. त्यानंतर जिल्ह्याला आधी ८५ हजार आणि नंतर ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला होता. आता रविवारी आणखी ७२ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. आधीदेखील ठाणे, नवी मुंबईला लसींचा जास्तीचा साठा मिळाला होता. आता आलेल्या ७२ हजार लसींमध्येदेखील ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणला जास्तीचा साठा मिळाला आहे. आता कोविशिल्डबरोबर कोवॅक्सिनचादेखील साठा मिळाला आहे.

ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेन्ड लॉकडाऊनचे कारण देत ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. परंतु जिल्ह्यासाठी मागील सोमवारी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला. मंगळवारी दुपारनंतर आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला. आता पुन्हा ७२ हजात ३०० लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे आता ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरणाला वेग आला आहे. या लसीमध्ये कोवॅक्सिनचा ७ हजार ३०० तर कोविशिल्डच्या ६५ हजार लस मिळाल्या आहेत. उपलब्ध झालेला साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाट्याला ४ ते १८ हजारपर्यंत साठा मिळाला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार सोमवारी लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर ठाण्यात सर्व ५६ केंद्र सुरू होती.

महापालिकानिहाय मिळालेला लसींचा साठा

कोविशिल्ड - कोवॅक्सिन

ठाणे - १५००० - १५००

नवी मुंबई - २०००० -२०००

कल्याण-डोंबिवली - १०००० -१५००

उल्हासनगर - ७००० - ५००

भिवंडी - २००० - -----

मीरा-भाईंदर - १०००० - १०००

ठाणे ग्रामीण - २००० -८००

--------------

एकूण - ७२३००

Web Title: Thane district got another stock of 72,300 vaccines