ठाणे जिल्ह्यात पावसाच्या सरी सुरूच; माळशेजमध्ये दरड घोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:20 IST2018-07-14T19:15:07+5:302018-07-14T19:20:18+5:30
क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम्यान खाडी किनारी ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा आंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने वर्तवला.

सव्वा चार वाजेच्या दरम्यान माळशेज घाटात दरड कोसळली
ठाणे : जिल्हाभर पावसाची रिमझिम सुरूच असल्यामुळे दुसरा शनिवार सुटीचा दिवस असूनही ठाणेकरांना घरातच राहावे लागले. सकाळपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा जोर मात्र वाढलेला आढळून आला. माळशेज घाटात ही पर्यटकांना बंदी केल्यामुळे पर्यटकांनी जवळपास राहणे पसंत केले. या दरम्यान आज सव्वा चार वाजेच्या दरम्यान माळशेज घाटात दरड कोसळली. दोन जण किरकोळ जखमी आहेत. यामुळे घाटातील वाहतूक काही काळ मंदावली. पण सायंकाळनंतर वाहतूक पुर्वत करता आली.
क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम्यान खाडी किनारी ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा आंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने वर्तवला. यानंतरचे पुढील सहा तासाच्या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मागील २४ तासाच्या कालावधीत ३५७.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने सरासरी ५१.०३ मिमी पाऊस पडल्याची नोंद केली. यापैकी सर्वाधिक पाऊस शहापूरत तालुक्यात ९० मिमी पडला. याखालोखाल अंबरनाथला ६२, तर उल्हासनगर आणि कल्याणला प्रत्येकी ५८ मिमी, भिवंडीला ४०, ठाणेला ३५ आणि सर्वात कमी १४ मिमी पाऊस मुरबाड तालुक्यात पडला. मात्र या तालुक्यातील माळशेज घाटात पावसाचा जोर अधूनमधून वाढत असून तेथे धुक्याचे प्रमाण ही वाढले आहे. यामुळेच घाटातील दरड कोसळली. या परिसरातील पर्यटक बंद असल्यामुळे सुदैवाने जीवीत हानी टळली.