शाळा प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत आरटीईचे ९३९ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:22 AM2018-07-13T03:22:37+5:302018-07-13T03:22:51+5:30

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 939 students of the RTE in the third round of school admissions | शाळा प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत आरटीईचे ९३९ विद्यार्थी

शाळा प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत आरटीईचे ९३९ विद्यार्थी

Next

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवड केलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळांमध्ये २० जुलैपर्यंत घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी पालकांना केले.
जिल्ह्यातील सुमारे ६४० शाळांमध्ये आरटीईद्वारे २५ टक्के प्रवेश मागासवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबीयांच्या बालकांना केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहे. आतापर्यंत दोन फेºयांद्वारे ५३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. प्ले ग्रुपसाठी १० विद्यार्थी, प्री-केजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थ्यांची, ज्यु.केजीसाठी ३१६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याप्रमाणेच सी.केजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गाकरिता ३८३ विद्यार्थ्यांना या तिसºया फेरीद्वारे दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे. यानंतर, त्वरित म्हणजे २१ जुलैपर्यंत संबंधित शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट म्हणून नोंद करावी व प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नॉट अप्रोच म्हणून लॉग इन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्या

दुसºया फेरीअखेर जिल्हाभरातील शाळांमध्ये पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यापैकी पहिल्या फेरीद्वारे तीन हजार ८९६ विद्यार्थ्यांची, तर दुसºया फेरीत एक हजार ४५६ विद्यार्थ्यांनी दिलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत पाल्याचा प्रवेश घेणे आवश्यक आहे.

जिल्हाभरात ठिकठिकाणी पहिल्या व दुसºया फेरीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी
शहराचे नाव पहिली फेरी दुसरी फेरी
अंबरनाथ २०१ ०९८
भिवंडी मनपा ६२० १९९
भिवंडी ग्रा. ०२२ ०२८
कल्याण ग्रा. १२७ ११३
कल्याण-डों. मनपा ४७३ १७९
मीरा-भार्इंदर मनपा ००८ ००९
मुरबाड ००७ ०१४
नवी मुंबई मनपा १२७९ ५२२
शहापूर १४८ ०४१
ठाणे मनपा-१ २७२ ०५६
ठाणे मनपा-२ ५२८ १३९
उल्हासनगर २१३ ०५८

Web Title:  939 students of the RTE in the third round of school admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.