वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 20:05 IST2022-06-05T20:05:05+5:302022-06-05T20:05:16+5:30

यावेळी ठाणे जिल्ह्याने कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल या कार्यक्रमात ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला.

Thane District Collector honored for outstanding performance under Vasundhara Abhiyan | वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

ठाणे: वसुंधरा अभियान २.० अंतर्गत विभागस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा र िववारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वसुंधरा अभियान २.० अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या नगरपालिका, अमृत शहरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदी संस्था आणि अधिकाऱ्यांना पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत झालेल्या आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्ह्याने कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल या कार्यक्रमात ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

Web Title: Thane District Collector honored for outstanding performance under Vasundhara Abhiyan