Thane court orders filing of stamp duty scam case | मुद्रांक शुल्कात घोटाळ्याप्रकरणी ठाणे न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

मुद्रांक शुल्कात घोटाळ्याप्रकरणी ठाणे न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

भाडे करार आदींचे मुद्रांक शुल्क शासनास न भरता ग्राहकांना मात्र बनावट चलन तसेच गैरप्रकार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मीरारोड पोलिसांना दिले आहेत. 

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील एस.के. इंटरप्रायजेस ह्या दुकानामध्ये सदनिका, दुकाने यांचे करार नोंदणीसाठी लागणारी मुद्रांक शुल्क, नोंदणी फी शासनाच्या खात्यात चलनद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करून करारनामा नोंदणीकृत करण्याची कामे शासनाचे परवाना धारक एजंट म्हणून केली जातात. गणेश लोहकरे  हे परवाना धारक असून गेल्या पाच वर्षां पासून ही कामे ते करत आहेत. 

मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांनी सदर परवाना धारक केंद्रातून शासनास मुद्रांक शुल्क न भरताच ग्राहकांना मुद्रांक भरल्याची बनावट इ चलन देऊन शासन व ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार काही कागदपत्रे सादर करून केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी केल्या होत्या. 

परंतु सदर प्रकार उघडकीस आल्यावर लोहकरे यांनीच २९ डिसेंबर २०२० रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने ठाणे न्यायालयात धाव घेतली.  त्यांच्या कडे काम करणाऱ्या सागर आरडे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Thane court orders filing of stamp duty scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.