ठाणे: उसनवारीच्या पैशावरुन कळव्यात तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 20:26 IST2017-08-24T20:26:27+5:302017-08-24T20:26:41+5:30
उसनवारीचे पैसे न दिल्याच्या वादातून कळव्याच्या जानकीनगर येथील शैलेश किर्तीकर या २५ वर्षीय तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करणा-या प्रविण कदम आणि बाबू भोसले या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे: उसनवारीच्या पैशावरुन कळव्यात तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे, दि. 24 - उसनवारीचे पैसे न दिल्याच्या वादातून कळव्याच्या जानकीनगर येथील शैलेश किर्तीकर या २५ वर्षीय तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करणा-या प्रविण कदम आणि बाबू भोसले या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
शैलेश हा त्याचा मित्र दिलीप शिंत्रे याच्यासह कळव्यातील मनिषानगर येथील स्मशानभूमीजवळ २३ आॅगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास उभे होते. त्यावेळी शैलेशने घेतलेले ३० हजार रुपये न दिल्याच्या कारणावरुन प्रविण याने त्याच्या डोक्याला लाकडी बांबूने मारहाण केली. तर बाबू भोसले पैसे परत न केल्यास आणखी मारहाण करण्याची धमकी दिली. या दोघांविरुद्ध शैलेशने बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक दिनेश शेलार यांनी सांगितले.