शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार

By सदानंद नाईक | Updated: April 18, 2025 07:45 IST

Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती.

- सदानंद नाईक, उल्हासनगरबालकल्याण समितीच्या खडवलीच्या बालआश्रमात चार मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. संचालक बबन शिंदे याच्याकडे तक्रार करूनही त्याने याकडे कानाडोळा केला. 

साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. अनेक मुलांच्या शरीरावर त्याचे वळ आढळले. मुला-मुलींना रक्त निघेल इतके चिमटे काढण्यात आले, असे बालकल्याण समितीच्या चाैकशीत आढळले आहे.

खडवली येथील बालआश्रमाचे संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, मुलगा प्रसन्न बबन शिंदे यांच्यासह मदत करणारे प्रकाश सुरेश गुप्ता व दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांवर  टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

६ मुली विशेष बालगृहात 

बालआश्रमातील मुलांचे वय साडेतीन ते १२ वर्षांपर्यंत असून त्यामध्ये २० मुली व नऊ मुलांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या आतील सहा मुलांना नेरुळ नवी मुंबई येथील विशेष बालगृहात पाठविले असून यातील चार मुलांना स्वतःचे नावही धड सांगता येत नाही. बालकल्याण समितीचे प्रतिनिधी मुलांच्या पालकांशी संपर्क साधत आहेत.

शासकीय मान्यताप्राप्त २५ बाल आश्रम

ठाणे जिल्ह्यात शासनाची मान्यताप्राप्त २५ बाल आश्रम असून त्यामध्ये शिंदेच्या आश्रमाचा समावेश नाही. शासकीय दोनच बाल आश्रम असून त्यातील एक भिवंडीत तर दुसरा उल्हासनगरात आहे. 

आश्रमाच्या नावावर देणग्या

‘पसायदान विकास संस्थेचा संचालक बबन शिंदे हा पुणे जुन्नर येथील राहणारा. तो यापूर्वी मुंबईत कामाला होता. आश्रमाची जागा व इमारत त्यांची स्वतःची आहे. 

२०१६ साली धर्मादाय आयुक्तांकडून बाल आश्रमाची परवानगी घेऊन खडवली येथे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून बाल आश्रम सुरू केला. आतापर्यंत साडेतीन हजार मुलांनी आश्रमाचा फायदा घेतल्याचा दावा त्याने केला. 

आश्रम चालवण्याकरिता त्याने देणग्या घेतल्याचे उघड झाले. शिंदेला कुठल्या नेत्याचा राजाश्रय होता, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

मुलींचे समुपदेशन सुरु

न्यायालयाने आरोपींना १६ एप्रिलला न्यायालयीन कोठडी दिली, अशी माहिती टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली. चौकशीत चार मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. इतर मुलींचे समुपदेशन सुरू असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाणे यांनी दिली आहे.  

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस