शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

'ठाणे कॅप्टनसोबतच खेळाडूही चांगले; आयुक्त-लोकप्रतिनिधींमधील खोडा काढला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:12 IST

जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाºया अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

ठाणे : आता गैरसमज दूर झाले आहेत. चांगले काम करणाऱ्या टीममध्ये खोडा घालण्याचा प्रकार काही जण करत असतात. तो खोडा आम्ही काढून टाकला आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना उद्देशून केले. ठाणे महापालिकेत शिवसेनेसह अन्य पक्षांचे नगरसेवक व आयुक्त जयस्वाल यांच्यात दोन आठवडे रंगलेला वाद मंगळवारी मातोश्रीवर शमला. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले की, टीम वर्क महत्त्वाचे आहे. टीममध्ये चांगला कॅप्टन आणि खेळाडू नसतील, तर त्या दोघांचा काही उपयोग नाही. मात्र, ठाण्यात हे समीकरण चांगले जुळून आल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाºया अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले की, दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन उपकरणे विजेवर चालतात. पण, ती हाताळणारी माणसे ही फार महत्त्वाची असतात, असे सांगत त्यांनी परिचारिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना व्यासपीठावर बोलवले. मात्र, आपण ते ‘लगे रहो मुन्नाभाई’सारखे केलेले नाही, असे मिश्कीलपणे ते म्हणाले.जिल्हा रुग्णालयासाठी आठ दशकांपूर्वी आपली जमीन देणारे विठ्ठल सायन्ना यांचाही त्यांनी भाषणात गौरव केला. जमिनी हडप करण्याकडे लोकांचा कल असतो. पण, आपली जमीन सार्वजनिक हितासाठी दान करणारी माणसे विरळ होत चालली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलुंड आणि ठाणेदरम्यान रेल्वेस्टेशन करण्याचे महत्त्वाचे काम आपण करणार आहोत. अनेक वर्षांपासून ही ठाणेकरांची मागणी आहे. वाढत्या लोकसंख्येला एकेक मार्ग देत असताना स्टेशनचीही गरज आहे असे ते म्हणाले.बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारआरोग्य क्षेत्रात उत्तम सेवा बजावणाºया व्यक्ती आणि संस्थांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा याप्रसंगी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तज्ज्ञांची निवड समिती विजेत्यांची निवड करणार असून आरोग्य क्षेत्रात, विशेषत: सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका