Thane: भिवंडीत श्रमजीवी संघटना आक्रमक, मनपा मुख्यालयाचे प्रवेशद्वार तोडून इमारतीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

By नितीन पंडित | Published: March 4, 2024 06:34 PM2024-03-04T18:34:52+5:302024-03-04T18:35:44+5:30

Bhiwandi News: मनपातील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे,या कामगारांना कामगार कायद्यानुसार योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच शहरातील आदिवासी वस्ती असलेल्या भागात मूलभूत सुविधा सुरळीत करण्यात यावी या व अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले.

Thane: Bhiwandi labor union aggressive, breaking the entrance of municipal headquarters and protesting at the entrance of the building | Thane: भिवंडीत श्रमजीवी संघटना आक्रमक, मनपा मुख्यालयाचे प्रवेशद्वार तोडून इमारतीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

Thane: भिवंडीत श्रमजीवी संघटना आक्रमक, मनपा मुख्यालयाचे प्रवेशद्वार तोडून इमारतीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

- नितीन पंडित
भिवंडी - मनपातील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे,या कामगारांना कामगार कायद्यानुसार योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच शहरातील आदिवासी वस्ती असलेल्या भागात मूलभूत सुविधा सुरळीत करण्यात यावी या व अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन केले.

सकाळी उन्हात रस्त्यावर बसलेल्या श्रमजीवी कार्यकर्त्यांकडे मनपा आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने अखेर श्रमजीवी संघटना आक्रमक होत सायंकाळी चार वाजता संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेलं लोखंडी गेट तोडून मुख्यालय प्रांगणात प्रवेश केला. त्यानंतर प्रवेशद्वारा समोरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मनपा मुख्याल्या समोरून उठणार नाहीत असा निर्धार या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या आंदोलनात श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,प्रवक्ता प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे, शहराध्यक्ष सागर देसक,कामगार संघटनेचे महेंद्र निरगुडा,महिला पदाधिकारी संगीता भोमटे,श्रमजीवी कार्यकर्ते मोतीराम नामखुडा,मुकेश भांगरे यांच्यासह श्रमजीवीचे कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Web Title: Thane: Bhiwandi labor union aggressive, breaking the entrance of municipal headquarters and protesting at the entrance of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.