ठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 23:18 IST2020-12-02T23:16:20+5:302020-12-02T23:18:47+5:30

ठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Thane automobile company defrauded of Rs 42 lakh: Two arrested | ठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक

वीम्याचे कमिशनही हाडपल्याचा आरोप

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईवीम्याचे कमिशनही हाडपल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाºया पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. यातील अरोरा याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर रांका याला १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पक रांका याने त्याची पत्नी रश्मी रांका तसेच आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीचे व्यवस्थापक विधी अरोरा आणि त्यांची पत्नी रुपाली कदम या चौघांनी मिळून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांनीही या कंपनीमध्ये एका कंटेनरमधून आलेल्या १९ लाखांच्या ४० दुचाकींची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून वीमा कंपनीकडून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीला वीम्यापोटी दिले जाणारे कमिशनही परस्पर लाटले. कमिशन आणि ४० दुचाकी मिळून सुमारे ४२ लाख ५० हजारांचा अपहार केल्याची तक्रार साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीच्या वतीने विनोद शेट्टी (३८) यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी दाखल केली. हा प्रकार १९ आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी पुष्पक रांका, रश्मी रांका, विधी अरोरा आणि रुपाली कदम या चौघांविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पुष्पक रांका याला तर अरोरा याला २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले..

Web Title: Thane automobile company defrauded of Rs 42 lakh: Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.