शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी 'त्या' हल्लेखोरास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:18 IST

सोमवारी सांयकाळी पिंपळे या त्यांच्या पथकासह कासारवडवली येथील बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.

ठाणे : ठाणे महापालिकेमधील माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक या दोघांवर हल्ला करणाऱ्या अमरजित यादव या हल्लेखोरास ठाणे न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या हल्लेखोरावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी बोलताना दिली.

सोमवारी सांयकाळी पिंपळे या त्यांच्या पथकासह कासारवडवली येथील बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सुरू असताना, यादव याने रागाच्या भरात हाती चाकु घेऊन पिंपळे याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून हाताची बोटे कापली गेली आहेत. तसेच त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेला अंगरक्षक याच्या ही हाताचा बोट कापला गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कासारवडवली पोलिसांनी हल्लेखोर यादव याला अटक केली. तसेच मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर यादव याच्या यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात होते. मात्र प्राथमिक तपासात त्याच्यावर एक गुन्हा यापूर्वी दाखल नाही. तसेच त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली.

'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

हल्लेखोरास मनसे चोपणार 

परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कोणी असं अधिकाऱ्यांवर हल्ला केली नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे