Thane: कळवा खाडीतील नाल्यामध्ये मिळाला अनोळखी मृतदेह, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: August 1, 2023 17:56 IST2023-08-01T17:55:40+5:302023-08-01T17:56:12+5:30
Thane: खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला.

Thane: कळवा खाडीतील नाल्यामध्ये मिळाला अनोळखी मृतदेह, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा
- जितेंद्र कालेकर
ठाणे - खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला. हा मृतदेह कोणाचा आहे? त्याने आत्महत्या केली की तो अपघाताने पडला, याचा तपास सुरु असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.
खारेगाव ब्रिजजवळ, स्मशानभूमीच्या समोर मुंबई-नाशिक रोडवर कळवा खाडीला मिळणाऱ्या नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला १ आॅगस्ट रोजी दुपारी मिळाली. त्याचआधारे घटनास्थळी कळवा पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचेकर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत नाल्यातील हा मृतदेह बाहेर काढून तो कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला. तो उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा मृतदेह कोणाचा आहे? तो अपघातानेच पडला की आणखी काही वेगळा प्रकार आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले