शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Thane: शरद पवार गटातील ८ माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते अजित पवार गटात, जितेंद्र आव्हाडांना धक्का

By अजित मांडके | Updated: July 23, 2024 22:28 IST

Thane News: मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

- अजित मांडके ठाणे - मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा जाहीर पक्ष प्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. याचदरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रिटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेख जफर नोमानी, माजी नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज (मामा) शेख, सय्यद शमविल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्ते पदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्ष पदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा-कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड