ठाणे : सावरकर नगर भागातील जलकुंभाच्यावरील स्लॅब कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:10 IST2022-04-05T21:10:15+5:302022-04-05T21:10:25+5:30
मागील दोन ते तीन वर्षापासून हा स्लॅब कमकुवत झाल्याची माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांनी दिली.

ठाणे : सावरकर नगर भागातील जलकुंभाच्यावरील स्लॅब कोसळला
ठाणे : सावरकर नगर भागात असलेल्या महापालिकेच्या जलकुंभाच्या वरील स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मात्र स्लॅब केव्हा कोसळला हे समजू शकले नाही. मागील दोन ते तीन वर्षापासून हा स्लॅब कमकुवत झाल्याची माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांनी दिली. मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेनंतर दिसून आले आहे. हा स्लॅप टाकीतील पाण्यात कोसळल्याने संपूर्ण रॅबिट हे पाईप लाईन मध्ये जमा झाले आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाहही कमी झाला आहे.
सावरकर नगर भागात ही टाकी १९८५ साली बांधण्यात आली असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. या टाकीवरून किसन नगर, सावरकर नगर, इदिरानगर आदींसह सात भागांना पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन ते चार वर्षापासून या जलकुंभाच्या वरील स्लॅब हा कमकुवत झाला होता. यासंदर्भात येथील कामगारांनी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्याकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे या जलकुंभामधून होणारा होणारा पाणीपुरवठा तपासण्यासाठी असलेले इंडिकेटर बंद होते, त्यामुळे त्यामुळे पाणी किती येते किती जाते हे समजू शकत नव्हते. त्यामुळे पाण्याची पातळी तपासण्यासाठी मंगळवारी सायंकाळी कामगार आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. या जलकुंभांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी राजीव शिरोडकर यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्या शिवाय राहणार नाही अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.