ठाण्यातील टिटवाळा परिसरात मानसिकदृष्या दुर्बल असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. पीडिताच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली.
सुनील पवार (वय, ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवारी पीडिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडिताने घरी गेल्यानंतर तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगतिला. त्यांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीडिताच्या तक्रारीवरून आम्ही आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर त्याला परिसरातून अटक केली. आरोपीला कल्याणमधील विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत."