शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ५० हजारांच्या अनुदानासाठी ठाणे-पालघरचे २५ हजार शेतकरी पात्र

By सुरेश लोखंडे | Updated: August 7, 2022 18:08 IST

Thane: शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषित केले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे -  शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरत असल्याचे उघड झाले आहे.

आधीच्या सरकारने थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त केले आहे. मात्र सतत व नियमित कर्ज भरूनही त्या शेतकºयांना सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी तीन वर्षे कर्ज फेडीची अट घातली होती. त्यामुळे शेतकरी नाराज होते. त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करीत शेतकºयांच्या हितासाठी शिंदे सरकारने तीन पैकी दोन वर्षे नियमित कर्ज फेड करणाºया शेतकºयांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यास अनुसरून पात्र शेतकºयांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे व पालघर जिलहह्यातील २५ हजार शेतकरी या अनुदानाचे लाभार्थी ठरणार आहे.

जिल्ह्यातील २०१९ मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेले आणि नैसिर्गक आपतीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पण नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनाही ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय या शिंदे सरकारने महिन्याभरापूर्वी घेतला आहे. या अनुदानाचा लाभ राज्यभरातील तब्बल १४ लाख शेतकºयांना होणार आहे. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश  आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार ९७१ आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रु पये अनुदान मिळवण्यासाठी २०१७ पासून तीन वर्षे नियमित कर्जफेड केलेली असावी, अशी अट आधीच्या सरकारने ठेवलेली होती. आता या सरकारने तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत कर्जाची नियमित पूर्ण परतफेड केली असेल तरीही अनुदान देण्याचे घोषीत केले आहे.  यादरम्यान एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केले असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील तीन वर्षांचे खातेदार व त्यातील पात्र शेतकरी खालीलप्रमाणे.

ठाणे जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी२०१७-१८ - ९७४३- ८३५९२०१८-१९ - ११४२५ - ९६३८२०१९-२० - १०६१५- ८९७१

पालघर जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी-२०१७-१८ - १७९५३- १५०९९२०१८-१९ - २०३३४ - १६९६७२०१९-२० - १८९३४- १५९०२

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार